Breaking News

भारतीय चलनात 50 रुपयांची नवी नोट

नवी दिल्ली, दि. 18, ऑगस्ट - 1000 आणि 500 च्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर नव्याने 2000 आणि 500च्या नोटा चलनात आल्या. आता आणखी एक नोट चलनात येणार आहे तीही नव्या स्वरुपात आहे.
500 आणि 2 हजार रूपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या आहेत. 500 रूपयांच्या नोटांचा रंग हा साधारण राखाडी रंगाशी मिळताजुळता आहे आणि 2 हजारांच्या नोटांना जांभळा रंग देण्यात आला आहे. आता 50 रूपयांची नवी नोट चलनात येणार आहे. तिचा रंग मयुर पंखी हिरवा असणार आहे.
आता 50 रूपयांचीही नवी नोट चलनात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आरबीआय डिसेंबर महिन्यातच 50 आणि 20 रूपयांची नवी नोट चलनात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार या नव्या नोटा छापण्याचंही काम सुरु झाले. आता या नोटा लवकरच चलनात येणार आहेत.