Breaking News

भारतीय प्रशासकीय सेवेतील 54 अधिका-यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

देहरादून, दि. 18, ऑगस्ट - स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याने उत्तराखंडमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील 54 अधिका-यांना राज्य  सरकारकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. या 54 अधिका-यांनामध्ये प्रधान सचिव, अतिरिक्त सचिव यांसारख्या वरिष्ठ अधिका-यांचा समावेश  आहे. उत्तराखंडमध्ये एकूण 87 प्रशासकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी 10 जण प्रतिनियुक्तीवर आहेत. नोटीस बजावण्यात आलेल्या 54 अधिका-यांपैकी 1  अधिकारी प्रधान सचिवपदी, 46 अधिकारी अतिरिक्त सचिवपदी, पाच अधिकारी प्रभारी सचिव आणि दोन सचिवपदी कार्यरत आहेत. या अधिका-यांना या संदर्भात  लवकरात लवकर उत्तर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर समाधानकारक न नसल्यास गोपनीय सेवा अहवालात प्रतिकूल शेरा मारण्यात येईल.