Breaking News

बिहारला पुराचा तडाखा; आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू

पाटणा, दि. 18, ऑगस्ट - बिहारमध्ये 72.44 लाख नागरिकांना पुराचा तडाखा बसला असून पुरात आतापर्यंत सुमारे 72 जणांचा मृत्यू झाला आहे.
14 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. अररियामध्ये 20, सीतामढीमध्ये 11, पश्‍चिम चंपारपमध्ये 9, किशनगंज 8, मधुबनी 5, पूर्णिया - 5, मधेपुरा - 4,  दरभंगा - 4, चंपारण - 3 शिवहर - 2 तर, सुपौलमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विशेष सचिव अनिरूद्ध कुमार  यांनी दिली.
खराब हवामानामुळे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी करू शकले नाहीत . बिहारमधील पूरग्रस्त  नागरिकांना मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असून पूरग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्‍वासन मोदी यांनी दिले,  अशी माहितीही अनिरूद्ध कुमार यांनी दिली.