Breaking News

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इंडिगो विमानांच्या 84 फेर्‍या रद्द

नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - इंडिगो एअरलाईन्सच्या 13 विमानांतील इंजिनांमध्ये बिघाड झाल्यामुळेया कंपनीला आपल्या विमानांच्या 84 फेर्‍या रद्द कराव्या  लागल्या आहेत . इंजिनात बिघाड झालेल्या विमानांचा वापर थांबवल्याने 84 फेर्‍या रद्द करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले . 
इंडिगो कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की , आमच्या विमान सेवेविषयी गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमधून चुकीची माहिती प्रसारित  होत आहे. 8 नीओ या प्रकारातील विमाने उपलब्ध नसल्याने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आमच्या विमानांच्या काही फेर्‍या रद्द कराव्या लागल्या.