0
हिंगोली, दि. 18, ऑगस्ट - बनावट नोटा तयार करणार्या एका टोळीचा आज हिंगोली पोलिसांनी पर्दाफाश करत या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. हे  आरोपी बनावट नोटा तयार करत होते. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून आरोपींची नावे अजून उघड केलेली नाहीत. या आरोपींकडे पाचशे  आणि दोन हजाराच्या 9 लाख रूपयांच्या नोटा पोलिसांनी या तिघांकडून जप्त केल्या आहेत. यापूर्वी औरंगाबाद येथे सहा महिन्या पूर्वी अशीच घटना घडली होती.  आठच दिवसांपूर्वी यवतमाळ येथून येवून हिंगोली येथे बनावट नोटा वापरात आणण्याच्या हेतूने देणा-या टोळीला पोलिसांनी पकडले होते. बनावट नोटा प्रकरणात ही  तिसरी घटना आहे. 

Post a Comment

 
Top