Breaking News

हिरकणी पतसंस्थेवरील महिलांचा विश्‍वास कायम राखणार : अ‍ॅड वृषालीताई बोंद्रे

हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात  

बुलडाणा, दि. 18 - महिलांचे सक्षमीकरण हा उदे्श डोळयासमोर ठेवून संपुर्णपणे महिला संचालीत पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयावर  विश्‍वास ठेवून परीसरा बरोबरच जिल्हाभरातून महिलांचा दिवसा गणीत वाढता पाठींबा मिळाला. त्याच्या आधारावरच हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेने अल्पवधीत  बँकींग क्षेत्रात उभारी घेत सर्वांचा विश्‍वास संपादन केला. त्यामुळेच संस्थेचे प्रगती होवून शाखा विस्तार करण्याचीही हिमंत निर्माण झाली. हाच विश्‍वास कायम  टिकवायचा आणी महिलांना सभासदांना, ग्राहकांना, ठेवीदारांना त्याच बरोबर संस्थेच्या हितचिंतकांना अधिका अधिका बँकींग सेवा उपलब्ध करून त्यांचा विश्‍वास सार्थ  ठरवायचा उपक्रम हिरकणी महिला अर्बन पतसंस्था राबवित आली आहे आणी भविष्यातही राबविणार आहे. असा निर्धार पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड.सौ.  वृषालीताई बोंद्रे यांनी पतसंस्थेच्या चिखलीत नटराज सभागृहात संपन्न वार्षीक सर्वसाधारण सभेत बोलतांना व्यक्त केला.
दिनांक 12 ऑगस्ट रोजी हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेची सर्व साधारण सभा संपन्न झाली. सर्वसाधारण सभेसाठी पंचायत समितीच्या सभापती सौ. संगिताताई  पांढरे, पोलीस उपनिरीक्षक निताताई गायकवाड, कलावतीबाई तळेकर, मृणालीनीताई सपकाळ, माजी नगरध्यक्षा सौ. शोभाताई सवडतकर, सौ. करूणाताई बोंद्रे,  नगरसेविका श्रीमती सुनिता शिगणे, सौ. शालीनीताई थोरात, शेख शमिनबी राजु रज्जाक, सुनंदा कासारे, आश्‍विनी भराड, रेणु बोंद्रे, शितल ठाकुर, यांची प्रमुख  उपस्थिती हेाती. हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेसाठी विशेष करून चिखलीचे आमदार राहुलभाउ बोंद्रे, चिखली तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष  विष्णु पाटील कुळसुंदर, माजी बाजार समिती सभापती संजय पांढरे, उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूषे, संचालक रूपराव पाटील यांनीही आवर्जुन उपस्थिती लावली होती.
या सर्वसाधारण सभेची प्रस्तावना करतांना सचिव सौ. किर्ती शिसोदीया यांनी संस्थेच्या धैयधोरणाची माहिती सभासदांना देवून संस्था राबवित असलेल्या विविध  उपक्रमाची माहिती सभासदांना दिली. हिरकणी कपडा बँक व हिरकणी दत्तक पालक योजना याची सविस्तर माहिती देवून संस्थेच्या नावलौकीकात या उपक्रमामुळे  झालेल्या लोकप्रियतेशी सभासदांना अवगत केले. गत वर्षाचा कार्य अहवाल महेश जाधव यांनी सभासदा समोर सादर केला. या सर्वसाधारण सभेत पोलीस उपनिरीक्षक  निताताई गायकवाड, मनिषा दांडगे, मृणालीनीताई सपकाळ, यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेसाठी संस्थेच्या सल्लागार वनिता माळोदे, मिनाताई भोेंडे, अशाताई  शिंदे, रेखा फेफाळे, सिमा नागवे, रेखा जाधव, माधुरी देशमुख, कांचन भोपळे, सुमन पाटील, ज्योती क्यावल, यांचेसह उपाध्यक्षा त्रिविणी हाके, सचिव किर्ती  शिसोदिया, संचालीका वंदना इंगळे, सौ. शानु श्रीवास्तव, नेन्हा खरात, सौ. स्नेहा सावजी, सौ. सविता वाघमारे, श्रीमती प्रमिला जाधव, अनिता घुगे, मनिषा भुते,  गिता भोजवानी, सौ. मालती चवरे, कौसर फातेमा यांची उपस्थिती होती.