Breaking News

नदीपात्रात वाळूमाफीयांचा दरोडा : लिलावच नाही मग वाळू उपसा कसा?

अहमदनगर, दि. 18 - तालूक्यातील दिघोळ धनेगाव नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून अनेक जणांनी हजारो ब्रास वाळूचे साठे केले असल्याचे पहावयास  मिळत आहे. दररोज हजारो ब्रास वाळूची अवैधरीत्या दिवसाढवळ्या वाहतूक होत आहे महसूल व पोलीस प्रशासनाचे अर्थपुर्ण दूर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. 
त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यातील वंजारवाडी (धानोरा) येथील महाराष्ट्र शासनाच्या गट नं 41 मधून गेल्या सहा महिन्यांपासून रात्रंदिवस दररोज अनाधिकृतपणे वाळू  उपसा होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून लिलावच झालेला नाही संबधित ग्रामपंचायत प्रशासन अर्थाअर्थी डोळेझाक करत आहे येथून पिंपरखेड, फक्रारबाद, आरणगाव,  डोणगाव, पारेवाडी, कवडगाव, भवरवाडी आदी ठिकाणी वाळू जात आहे हा प्रकार राजरोसपणे सुरू असताना महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून  कोणी तक्रार केल्यानंतर सदर वाहनाचा व वाळूचा पंचनामा केला जातो व  नंतर आर्थिक तडजोडीने मिटवलि जाते. त्यामुळे महसूल प्रशासन त्यांच्यावर कारवाई  करण्यास धजावत नाही सध्या तालुक्याला तहसीलदार नसल्याने गौणखनिजाच्या अवैध  धंद्याला उत आला आहे. वाळू उपसा करणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते  आघाडीवर आहेत यांचेच  वाळूसाठे करणारात समावेश आहे पोलीस व महसूल प्रशासनाला याबाबत माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे शासनाला  लाखो रूपयांचा चूना लावणार्‍या वाळूमाफीयांवर कारवाई होणे काळाची गरज आहे ही कारवाई कोण करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.