Breaking News

शरीफ पिता-पुत्रांना भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून समन्स जारी

लाहोर, दि. 18, ऑगस्ट - आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात माजी पंतप्रधान नवाज शरीफ व त्यांच्या दोन मुलांना भ्रष्टाचार विरोधी पथकाने  समन्स बजावले आहे. यामध्ये शुक्रवारी कार्यालयात हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेने शरीफ आणि त्यांचे दोन पुत्र हुसैन व हसन यांना समन्स बजावले आहे. परदेशातील मालमत्तेशी संबंधित  चौकशीसाठी या तिघांना लाहोरमधील कार्यालयात हजर रहाण्यास सांगितले आहे.
पनामा कागदपत्रांप्रकरणी शरीफ यांच्या अन्य देशांत मालमत्ता असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर 28 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने  शरीफ यांना दोषी करार दिला होता.