0
नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - फरिदाबादमध्ये जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्याची तक्रार दाखल न करुन घेणा-या सूरजकुंड पोलीस ठाण्याच्या पोलीस  उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. ’जेएनयु’ च्या विद्यार्थ्यांनी झालेल्या घटनेची तक्रार केली असतांनाही पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली  नाही,यामुळे पोलीस आयुक्त डॉ. हनीफ कुरेशी यांनी ही कारवाई केली.
पोलीस आयुक्त कुरेशी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी पोलीस उप अधीक्षक पूजा डाबला यांच्याकडे सोपविली आहे. 14 ऑगस्ट रोजी सूरजकुंड  येथून परतत असतांना काही आरोपींनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांना मारहाण केली. तसेच काही विद्यार्थीनींचा विनयभंगही केला. या प्रकरणाची  तक्रार विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात केली मात्र पोलिसांनीही त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top