0
सिनसिनाटी, दि. 19, ऑगस्ट - सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये प्रस्थापितांना पराभवाचा धक्का बसला. अव्वल मानांकित राफेल नडाल आणि  तृतीय मानांकित डॉमिनीक थिएम या दोघांना उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. बिगरमानांकित ऑस्ट्रेलियाच्या निक कार्गिओसने नडालला 6-2, 7-5 अशा  सरळ सेटमध्ये अगदी सहजपणे पराभूत केले. तर बिगरमानांकित डेव्हिड फेररने थिएमचा 6-3, 6-3 असा पराभव केला. त्यामुळे आता उपांत्य फेरीत फेरर विरूद्ध  कार्गिओस असा सामना रंगणार आहे.
दुसरीकडे 7वा मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह आणि 14वा मानांकित जॉन इसनर या दोघांनी लौकिकाला साजेसा खेळ करून उपांत्य फेरीत धडक मारली. दिमित्रोव्हने  बिगरमानांकित जपानच्या युईची सुगीता याला 6-2, 6-1 असे पराभूत केले. तर इसनरने त्याचा सहकारी डोनाल्डसन याच्यावर 7-6 (7-4), 7-5 असा विजय  मिळवला. उपांत्य फेरीत दिमित्रोव्ह आणि इसनर एकमेकांपुढे उभे ठाकणार आहेत.

Post a Comment

 
Top