Breaking News

आता पिंपरी-चिंचवडमध्येही वेणी कापण्याचे लोण

पिंपरी-चिंचवड, दि. 18, ऑगस्ट - उत्तर भारतात महिलांच्या वेण्या कापण्यावरून खळबळ उडालेली असतानाच त्याचे लोण महाराष्ट्र सुद्धा पसरल्याचे दिसून आले  आहे. मुंबई आणि पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये एका 42 वर्षीय महिलेची अज्ञातांनी वेणी कापली आहे. आबिदा अन्सारी असे वेणी कापल्या गेलेल्या महिलेचे  नाव असून या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 42 वर्षीय आबिदा आपली मुलगी मुस्कान आणि आलिया यांना महानगरपालिकेच्या शाळेतून  घेण्यासाठी गेल्या होत्या. आबिदा यांच्यासोबत त्यांच्या शेजारी राहणारी महिला देखील होती. मुलींना शाळेतून घेऊन गेल्यानंतर आबिदा यांना डोके दुखीचा त्रास होत  होता. तेव्हा मुलीला मसाज करायला सांगितले. तेव्हा मुलीच्या हातात चक्क कापलेली वेणी लागली. विशेष म्हणजे घरापासून केवळ 200 मिटर अंतरावर शाळा आहे.  या प्रकरणामुळे अबिदा सध्या घाबरलेल्या आहेत. वेणी कापल्याचा प्रकार कोणी आणि का केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तक्रार कुणाविरोधात करणार असे  सांगत पीडितेने पोलिसांत तक्रार सुद्धा नोंदवलेली नाही. घाबरलेल्या आबिदा सध्या घरी नाहीत. त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी पाठवण्यात आले आहे.