Breaking News

सिनसिनाटी ओपन : सानिया-शुआई जोडीचे उपांत्य फेरीत ‘पॅक-अप’

सिनसिनाटी, दि. 19, ऑगस्ट - सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या गटात चतुर्थ मानांकित भारताच्या सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार पेंग  शुआई या जोडीचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. तैवानची साय सु-वै आणि रोमानियाची मोनिका निक्युलेस्कू या जोडीने त्यांच्यावर 6-4, 7-6 (8-6)  असा विजय मिळवला. मानांकन नसल्यामुळे सु-वै-निक्युलेस्कू जोडीकडून चाहत्यांच्या फारशा अपेक्षा नव्हत्या. याउलट सानियाची दुहेरीतील कामगिरी पाहता हा  सामना सानिया-पेंग जोडी सहज जिंकेल, अशी चाहत्यांना खात्री होती. पण सु-वै-निक्युलेस्कू जोडीने अप्रतिम खेळ केला आणि सामन्यावर वर्चस्व राखत अंतिम  फेरीत प्रवेश केला.