0
सोलापूर, दि. 19, ऑगस्ट - गणेश मंडळांनी मंडप उभारणीसाठी पोलिसांकडून घेतलेली परवानगी आणि प्रत्यक्षात उभे केलेले मंडप याची यंदा विशेष पथकांकडून  तपासणी होणार आहे. तपासणीमध्ये जे मंडप रस्त्यावर आहेत, विनापरवाना उभे केले आहेत किंवा वाहतुकीस अडथळा ठरणार आहेत, ते हटवण्याची जबाबदारी  पालिका आयुक्तांकडे असणार आहे. सण, उत्सव, समारंभ कालावधीत वाहतुकीस अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर मंडप टाकण्यास उच्च न्यायालयाने मनाई  केली आहे. अशा मंडपावर कारवाई करण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात सनियंत्रण समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीने  सोलापुरातील आठ क्षेत्रनिहाय पथकांची नियुक्ती केली आहे. हे पथक 19 ते 23 ऑगस्ट या कालावधीत सनियंत्रण समितीस अहवाल सादर करील, यानंतर 23 ते  25 असे तीन दिवस तपासणी होईल. सनियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी शिवाजी जगताप असून सहायक आयुक्त पौर्णिमा चौगुले मनपा उपायुक्त म्याकलवार हे  सदस्य आहेत. तीनही अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकांकडून तपासणी होईल. गणपती मंडळांनी उत्सवाची तयारी सुरू केली असून मंडप उभारणी सुरू  झाली आहे. 

Post a Comment

 
Top