Breaking News

सातवा वेतन लागू होण्यासाठी ग्रामीण डाक सेवकांची निदर्शने

प्रधान डाक अधिक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ढोल वाजवून ठिय्या

अहमदनगर, दि. 18 - सातवा वेतन त्वरीत लागू करण्याच्या मागणीसाठी आखील भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना, अहमदनगर शाखेच्या वतीने प्रधान डाक  अधिक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनात ढोल वाजवून ग्रामीण डाक सेवकांनी जोरदार निदर्शने  केली.
ग्रामीण डाक सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे सरकारने आश्‍वासन देवूनही, सदर मागणी मान्य न झाल्याने देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.  संपाच्या दुसर्‍या दिवशी गुरुवार दि.17 ऑगस्ट रोजी ग्रामीण डाक सेवकांनी धरणे आंदोलन केले. सदर मागणी मान्य होत नाही. तो पर्यंन्त संप मागे न घेता, आंदोलन  अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. ग्रामीण डाक सेवक हा पोस्ट खात्याचा कणा असून, महागाईच्या काळात त्यांच्या कुटुंबाचा  उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कित्येक किलो मीटर सायकलवर फिरुन ग्रामीण डाक सेवक नागरिकांना सेवा पुरवित आहे. त्यांना सन्माणाने जगण्यासाठी  तातडीने सातवा वेतन लागू करण्याची मागणी संघटेने केली आहे.