Breaking News

विजयदुर्ग किल्ल्यावर जागतिक हेलियम दिन साजरा

रत्नागिरी, दि. 18, ऑगस्ट - गेली अनेक वर्षे विजयदुर्ग किल्ल्यावरील सायबाचे ओटे येथे हा दिवस साजरा केला जातो. माजी आमदार आणि भाजपचे सिंधुदुर्ग  जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि त्यांचे सहकारी तसेच विजयदुर्गवासीय हा दिवस साजरा करत होते. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी विजयदुर्ग किल्ल्याला भेट  दिल्यानंतर त्यांनी सूचित केल्यानुसार यावर्षीपासून राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि विजयदुर्ग ग्रामपंचायतीतर्फे उद्याचा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
उद्या सकाळी आठ वाजता पडेल कँटीनपासून विजयदुर्ग एसटी बसस्थानकापर्यंत दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर नऊ वाजता तेथा विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत  शालेय मुलांसमवेत प्रभातफेरी आणि छत्र्यांच्या वाटपाचा कार्यक्रम होईल. दहा वाजता किल्ल्यावर हेलियम वायूची माहिती देणार्‍या फलकाचे अनावरण होईल. त्यानंतर  मान्यवरांची भाषणे होतील. सकाळी 11 वाजता विजयदुर्ग येथील पर्यटन महामंडळाच्या परिसरात डॉ. आठवले हेलियम डेविषयी माहितीपट प्रदर्शित करतील.
कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विजयदुर्गच्या सरपंच सौ. एस. एस. पडेलकर यांनी हेलियम डे उत्सव समितीच्या वतीने केले आहे.