0
लखनौ, दि. 18, ऑगस्ट - देशात लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संवादाअभावी अनेक वेळा सत्य परिस्थिती  जगासमोर येत नाही. त्यामुळे पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता एखाद्या घटनेचा पाठपुरावा करत त्यामागील सत्य समाजासमोर आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी येथे केले. प्रेरणा जनसंचार संस्था नोएडा आणि लखनौ जनसंचार संस्था यांच्या संयुक्तविद्यामाने  आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
पत्रकार ही समाजातील जबाबदारी व्यक्ती असून लोकशाहीमध्ये अधिकारासह त्यांची समाजाप्रती काही कर्तव्य आणि जबाबदा-याही आहेत. त्यामुळे पत्रकारांनी  समाजात वावरतांना परिस्थितीचे भान ठेवले पाहिजे. लेखणीचा वापर करतांना त्याचे काय परिणाम होतील याची जाणीव ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले. देशाच्या  प्रगतीसाठी पत्रकारांनी सकारात्मक भुमिका घेणे आवश्यक आहे. देशातील जनतेमध्ये एकजुटीची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. असे केल्यास लोकशाही  आणखी बळकट होईल, असेही ते म्हणाले. पुर्वी पत्रकारिता एक ध्येय होता. मात्र आता त्याचे बाजारीकरण झाले आहे,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

 
Top