Breaking News

पुरोहित यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली, दि. 18, ऑगस्ट - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी माजी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय सर्वोच्च  न्यायालयाने आज राखून ठेवला. न्यायमूर्ती आर.के. अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय खंडपीठाने याचिकाकर्ता आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे ऐकून  घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला . . पुरोहित यांच्या जामिनासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली.
पुरोहित यांच्याविरूद्ध ठोस पुरावे आहेत त्यामुळे या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवावा, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले . या  प्रकरणातील अन्य आरोपी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना जामीन मिळू शकतो. मग पुरोहित यांना जामीन का मिळू शकत नाही ? राष्ट्रीय तपास यंत्रणेची भूमिका दुटप्पी  असल्याचा आरोप साळवे यांनी केला.