0
कोलकाता, दि. 18, ऑगस्ट - पश्‍चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या सात नगरपालिकांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. या  निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दुस-या क्रमाकांच्या जागा मिळवल्या आहेत. एकेकाळचा सत्ताधारी असेलल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एकाही जागी विजय  मिळालेला नाही. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची धुपगुडी, हल्दिया, पान्सकुरा, दुर्गापूर, कूपर्स कॅम्प, नालहाटी व बुनियादपूर या नगरपालिकांमध्ये सरशी झाली. भाजप  सहा जागा मिळवत दुस-या क्रमांकावर आहे.
डाव्या आघाडीतील एक सहकारी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाला जागा मिळवता आली. मात्र काँग्रेस व डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्या आघाडीमुळे पराभव झाला आहे.  काँग्रेसबरोबरची आघाडी अशीच कायम राहिली तर पक्षाचे अस्तित्व धोक्यात येईल, असेही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे प्रदेश सचिव नरेन चॅटर्जी यांनी सांगितले.
आघाडी केल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचीही स्थिती वाईट होत आहे. काँग्रेस आता कुठेही दिसत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अशा प्रकारे विरोध कायम  ठेवायचा की बंगालच्या विकासासाठी एकमेकांना पाठिंबा द्यायचा, असे तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले आहे.

Post a Comment

 
Top