Breaking News

जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांवर माफी मागण्याची वेळ

औरंगाबाद, दि. 19, ऑगस्ट - अतिशय संवेदनशील अशा महत्त्वाच्या विषयावी बैठकांना उपस्थित न राहणे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांना चांगलेच  महागात पडले आहे. औरंगाबाद शहरात सध्या बेकायदेशिररित्या उभारलेली धार्मिक स्थळे हटविण्याचा विषय जोरदार चर्चेत आहे. न्यायालयाने अवैध व अतिक्रमहण  असलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही अशा प्रकारचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी केली तर  शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो असे कारण दाखवून तत्कालीन जिल्हाधिका-यांनी कारवाई टाळली होती. आता धार्मिक स्थळ  हटवण्याच्या विषयात वाद निर्माण झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करणे सुलभ जावे म्हणून काही बैठका बोलावण्यात आल्या होत्या. यातील काही  बैठकांना व्यस्ततेमुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस आयुक्त यशस्वी यादव उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली.  त्यामुळे याचिकेच्या सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी नाविलकिशोर राम आणि पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी औरंगाबाद खंडपीठात माफी मागितली.