Breaking News

शोपियन जिल्ह्यातील नऊ गावांभोवती सुरक्षा पथकांचा घेराव

शोपियन, दि. 19, ऑगस्ट - सुरक्षा पथकांनी आज जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील नऊ गावांभोवती घेराव घालून शोध मोहिम सुरु केली आहे. या  गावांमध्ये दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने लष्कराकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. 
सुरक्षा पथकाने दक्षिण काश्मीरमधील पडगामपोरा आणि हफश्रीमाल व्यतिरिक्त नूरपोरा त्रालमध्येही घेरावा घातला आहे. काल (19 ऑगस्ट) रात्री साडेदहा वाजता  उत्तर काश्मीरच्या वडूरा-सोपेररमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य पोलिसांच्या विशेष पथकाला संयुक्तरित्या कारवाई करत असतांना पाच संशियत  दहशतवादी असल्याचे आढळून आले. त्यामुळे सुरक्षा दलाच्या पथकाने चाकूरा, मंत्रीबग, झायपोरा, प्रताबपोरा, ताकीपोरा, रानीपोरा, रत्नीपोरा, दनगाम आणि वनगाम  या गावांमध्ये घेराव घालून शोधमोहिम सुरु केली आहे.