0
वाराणसी, दि. 19, ऑगस्ट - वाराणसीमध्ये ‘टॉयलेट’ चित्रपटाने प्रेरित झालेल्या गावक-यांनी आपले गाव शौचालय मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. येथील राज  सहानी या युवकाने गावातील सर्व नागरिकांना टॉयलेट : एक प्रेम कथा हा चित्रपट दाखविला. 
राज हा शिक्षण पूर्ण करुन गावात आल्यानंतर त्याला गावात शौचालयामुळे महिलांना होणारी समस्या जाणवली. त्याचेवेळी टॉयलेट : एक प्रेम कथा हा चित्रपटाविषयी  त्याने ऐकले व हा चित्रपट गावातील नागरिकांना दाखवण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट पाहिल्यानंतर गावातील नागरिक प्रेरित झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि  सर्व नागरिकांनी राज याचे कौतुक करत त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे त्याने सांगितले.

Post a Comment

 
Top