0
मुंबई, दि. 16, ऑगस्ट - रिलायन्स जिओनं आपल्या यूजर्ससाठी पुन्हा एक नवी ऑफर आणली आहे. टेलिकॉम क्षेत्रात स्वस्त ऑफरसोबतच जिओनं आता  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर आणली आहे. स्वस्त ऑफरनंतर जिओनं आता रिचार्जवर कॅशबॅक ऑफर आणली आहे. पेटीएमवरुन जिओचं 300  रुपयांचं रिचार्ज केल्यास यूजर्सला 76 रुपये कॅशबॅक मिळणार आहे.
या ऑफरसाठी यूजर्सला एक प्रोमो कोड देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्हाला कॅशबॅक मिळू शकेल. ही ऑफर मिळवण्यासाठी जिओ यूजर्सला काही स्टेप्स पार  पाडाव्या लागतील. सर्वात आधी पेटीएममधून मोबाइल रिचार्ज सेक्शनमध्ये जा. त्यानंतर पोस्टपेड किंवा प्रीपेड ऑप्शन निवडा. त्यानंतर तुमचा जिओ मोबाइल क्रमांक  टाका. नंतर रिचार्ज अमाउंट टाकून तुमचा प्रोमो कोड टाका आणि रिचार्ज करा. रिचार्ज केल्यानंतर पुढील 24 तासात तुम्हाला कॅशबॅक मिळेल. जर तुमच्याकडे प्रोमो  कोड नसेल तर तुम्ही तुमच्या पेटीएममध्ये जाऊन ऑफर सेक्शनमध्येही तुमचा प्रोमो कोड चेक करु शकता.

Post a Comment

 
Top