Breaking News

सत्तेच्या बळावर भूभाग बळकावणे अयोग्य - जपान

नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - कोणत्याही देशाने सत्तेच्या बळावर भूभाग बळकावणे अयोग्य आहे आणि चीनने तसे करू नये, असे मत जपानचे राजदूत केंजी  हिरामत्सू यांनी व्यक्त केले आहे. दोन्ही देशांनी हा वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवावा, असे आवाहनही हिरामत्सू यांनी केले आहे. वादग्रस्त डोकलाम भूभागावरून भारत  व चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आपण भारताच्या बाजूने उभे रहाणार असल्याचेही जपानने स्पष्ट केले.
भूतानच्या हद्दीत असलेल्या डोकलाम भूभागावर चीनकडून रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे. असा रस्ता बांधला गेल्यास भारत व भूतान यांच्यातील कराराचे उल्लंघन  होण्याबरोबरच भारतीय लष्कराच्या दृष्टीने अनेक अडचणी निर्माण होतील, असे जपानने म्हटले आहे.