Breaking News

दिल्ली उच्च न्यायालयात बॉम्ब असल्याच्या दूरध्वनीनंतर अति दक्षतेचा इशारा

नवी दिल्ली, दि. 18, ऑगस्ट - दिल्ली उच्च न्यायालयात बॉम्ब असल्याचा पोलिसांना दूरध्वनी आल्यानंतर परिसरात अति दक्षतेचा इशारा देण्यात आला होता.  परिसराची तपासणी करण्यात आल्यानंतर ही केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले . न्यायालयात बॉम्ब असल्याची खोटी माहिती अज्ञाताने दूरध्वनीद्वारे दिली होती. या  घटनेची माहिती मिळताच तात्काळ बॉम्बनाशक पथक, अग्निशमन दल आणि सुरक्षा यंत्रणा दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला.