Breaking News

जागरूकतेमुळे मंदिरातील चोरीचा प्रयत्न फसला

नांदेड, दि. 19, ऑगस्ट - पुजा-याच्या प्रसंगावधानामुळे आणि गस्तीविसांनी तत्परतेने धाव घेतल्याने मंदीरातील चोरी टळली. पोलिस येत असल्याची चाहूल  लागताच मंदिरात घुसलेले चोर दानपेटी मंदीरातच टाकून पळून गेले. अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील सत्यगणपती मंदिरात काल रात्री ही घटना  घडली.सत्यनारायण मंदिरात काल रात्री सात चोरांनी मंदिराचे दार तोडून प्रवेश करून दानपेटी फोडली. या वेळी उपस्थित कर्मचार्याला त्यांंनी तरवारीचा धाक  दाखवला. मंदीराच्या मागच्या बाजुस राहणा-या पुजा-याला मंदीरात चोर शिरल्याचा अंदाज आल्याने त्यांनी पोलिसांना फोन लावला. यानंतर थोडया अवधितच  पोलिस मंदीराच्या दारात आले असता चोरटयांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून पळ काढला दानपेटी मंदीराच्या दारात टाकून दिली. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस  गौतम वाव्हुळे व माधव गीते हे तातडीने घटनास्थळी आल्याने ही चोरी टळली मात्र चोर पसार झाले आहेत.