0
बुलडाणा, दि. 18 - चिखली तालुक्यातील मौजे खंडाळा मकरध्वज येथील मागासवर्गीय जातीचे दिनकर साळवे यांना 1986 मध्ये गट नं.265, मौजे मकरध्वज  खंडाळा शिवारात सिलींगची 97 आर शेत जमीन आहे. त्या शेतात रविंद्र किसन तोडकर हे उभ्या पिकात जनावरे घालून मधोमध रस्ता निर्माण करत आहेत. त्यामुळे  मालाचे नुकसान होत असल्याने दिपक साळवे न्याय मिळविण्यासाठी 15 ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. 
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रविंद्र तोडकर हे जातीय द्वेषातून वारंवार शेती करण्यास विरोध करतो व मला नेहमी जिवे मारण्याच्या  धमक्या देवून बळाचा व धनाचा वापर करीत शेतातून येणे-जाणे करतो. त्यामुळे मी त्रस्त असून माझ्या कुटूंबाला धोका निर्माण झाला आहे. तोडकर हा माझी शेती  हडप करण्याचा प्रयत्न करत असून याबाबत तहसिलदार चिखली यांना वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत मात्र रविंद्र तोडकर हा आर्थिक, राजकीय दृष्ट्या सक्षम  असल्याने अधिकारी वर्ग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे दिपक साळवे हे 15 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले  आहेत सदर उपोषणाला भारिप नेते शंकर मलवार, दिलीप वाघमारे यांनी गुरुवारी भेट दिली असून परिपूर्ण मदत करण्याचे आश्‍वासन दिले.      

Post a Comment

 
Top