0
नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - डोकलाम मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख बिपीन रावत  लेह-लडाखचा दौरा करणार आहेत. चीनच्या सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरी केल्याचे अलीकडेच उघडकीस आले होते . या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख रावत  लेह-लडाख येथील परिस्थितीचा आढावा घेणार असून यावेळी ते वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करणार आहेत. रावत यांच्या तीन दिवसीय दौ-यानंतर राष्ट्रपती रामनाथ  कोविंद 21 ऑगस्ट रोजी लेह-लडाखचा दौरा करणार आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीनमध्ये वाद सुरु आहेत. याच दरम्यान मंगळवारी (15 ऑगस्ट) रोजी लडाखमधील पँगाँग सरोवर  परिसरात दोन्ही राष्ट्रांच्या लष्कराच्या गस्ती पथकाच्या तुकड्या समोरासमोर आल्या होत्या. यावेळी चीनच्या लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत  प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे चीनच्या सैनिकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली.

Post a Comment

 
Top