Breaking News

राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका उषाताई चाटी यांचे निधन

नागपूर, दि. 18, ऑगस्ट - राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका उषाताई चाटी (वय 91) यांचे दीर्घ आजारामुळे आज निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी  सकाळी धंतोली परिसरातील अहिल्यादेवी मंदिरातून निघणार आहे. त्या समितीच्या तिस-या संचालिका होत्या.
हिंदु मुलींच्या शाळेत दीर्घकाळ शिक्षिका राहिलेल्या उषाताईंचे 1984 पासून अहिल्या मंदिरात वास्तव्य होते. अहिल्यादेवी स्मारक समितीच्या कार्यवाहिका असताना  त्यांनी अहिल्या मंदिरात सेवा प्रकल्प म्हणून वनवासी कन्या छात्रवास त्यांनी प्रारंभ केला. या छात्रवासात ईशान्य राज्यातील 42 मुली शिक्षण घेत आहेत.
त्यांनी राष्ट्र सेवा समितीचे उत्तर प्रदेशमध्येही काम केले. महिलांसाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी काम केले. 1994 ते 2006 पर्यंत त्या समितीच्या प्रमुख  संचालिका होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. आजारपणातच त्यांना देवाज्ञा झाली.