Breaking News

दिल्ली उच्च न्यायालयाने ‘एनडीटीव्ही’ची याचिका फेटाळली

नवी दिल्ली, दि. 18, ऑगस्ट - आयकर विभागाने केलेल्या कारवाईच्या विरोधात ‘एनडीटीव्ही’ने दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली  आहे. आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2008-09 आणि 2009-10 मध्ये एनडीटीव्हीचे ने केलेल्या आर्थिक व्यवहारांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला होता .  या निर्णयाला आव्हान देणारी याचिका एनडीटीव्हीने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.2008-09 आणि 2009-10 या वर्षांमध्ये एनडीटीव्हीने केलेले  व्यवहार बनावट असल्याचा पुरावा आयकर विभागाकडे आहे. स्थावर मालमत्ता तसेच चालू खात्याव्यतिरिक्त अन्य खात्यातील रोख रक्कम जप्त करण्याच्या आयकर  विभागाच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला .
एनडीटीव्ही ही बेहिशेबी मालमत्ता विकू शकते,अशी आयकर विभागाला शंका आहे.