Breaking News

वृद्ध व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल

अहमदनगर, दि. 19, ऑगस्ट - दुस-या व्यक्तीच्या मालकीचा फ्लॅट आपला स्वत:चा असल्याचे भासवून सदर फ्लॅट खरेदी करून देण्याचे खोटे आश्‍वासन देऊन  वृध्द व्यक्तीला साडेतीन लाख रूपयांचा गंडा घातल्या प्रकरणी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यवसायिकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.
पंडित गंगाराम घोरपडे (वय 69,राहाणार अहमदनगर)असे फसवणूक झालेल्या वृध्द व्यक्तीचे नाव आहे.या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी घनश्याम मारूती रोहोकले  (वय 55,राहाणार आनंद विहार,मल्हार चौक,अहमदनगर) नामक बांधकाम व्यवसायिकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहिती नुसार  घनश्याम रोहोकले याने पंडित घोरपडे यांना एक फ्लॅट दाखविला. सदरचा फ्लॅट 13 लाख 19 हजार रूपयांमध्ये खरेदी देण्याचे आश्‍वासन त्याने घोरपडे यांना दिले.  सदरच्या व्यवहारासाठी इसार म्हणून आरोपी रोहोकले याने घोरपडे यांच्याकडून साडेतीन लाख रूपए घेतले.मात्र काही काळानंतर आपण खरेदी केलेला फ्लॅट  रोहोकले यांच्या मालकीचा नसून तो अन्य कोणाचा असल्याचे घोरपडे यांना समजले.त्यामुळे पंडित घोरपडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात घनश्याम रोहोकले याच्या  विरूध्द फिर्याद दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी रोहेकले याच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.