0
नवी दिल्ली, दि. 18, ऑगस्ट - पद्म पुरस्कारासाठी आता कोणतीही व्यक्तीही ऑनलाईन शिफारस करु शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले.  येथील आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, आम्ही नव भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहोत. भारताला समृद्ध करण्यासाठी आणि नवीन बदल  घडवून आणण्यासाठीच्या कार्यात प्रत्येक नागरिक योगदान देऊ शकतो.
यापूर्वी पद्म पुरस्कार कसे मिळत होते हे तुम्हाला माहितच आहे? असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्ही यात  छोटासा बदल केला आहे. यापुढे आता कोणतीही व्यक्ती पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन शिफारस करु शकते. यामुळे देशाच्या कानाकोप-यातील प्रतिभावंतांनाही  ओळख मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

Post a Comment

 
Top