Breaking News

इनोव्हा दुभाजकावर धडकल्याने तीन ठार, सहा जखमी

नांदेड, दि. 19, ऑगस्ट - नांदेड-हैदराबाद मार्गावर नायगावजव्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले आहेत. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. या  अपघातातील पीडित सर्वजण आंध्र प्रदेशच्या कुर्नूलचे आहेत. भरधाव वेगात इनोव्हा कार दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात आरूषी  रणजितकुमार (वय 7), अनुराधा रणजितकुमार (वय 31) आणि चालक बोईजार्ज क्लिटंन (वय 22) हे तीनजण मरण पावले. अपघात झाल्याचे कळताच  गावक-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात हलविले. पण रूग्णालयात पोहोचेपर्यंत तिघांचा मृत्यू  झाला.