0
नवी दिल्ली, दि. 18, ऑगस्ट - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांची कन्या व खासदार मिसा भारती आणि लालू यांचे जावई शैलेश कुमार यांना  आयकर विभागाने पुन्हा समन्स बजावले आहे. आयकर विभागाकडून भारती आणि शैलेश यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाकडून मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश यांची चौकशी करण्यात आली होती. 

Post a Comment

 
Top