Breaking News

आंबेडकरी चळवळ मजबूत होणे ही काळाची गरज - प्रा सकटे

अहमदनगर, दि. 18 - आंबेडकरी चळवळ मजबूत होणे हि काळाची गरज असून कोपर्डीतील घटना निंदनीय असून त्या पार्श्‍वभूमीवर अन्याय, अत्याचार व  आरक्षणासाठी एकत्रित आलेला मराठा समाज हि चांगली गोष्ट असून त्यांच्या आंदोलनाला आपण सलाम करतो तसेच दलित महासंघ हा मराठा आरक्षणाच्या बाजूने  उभा आहे. फक्त मराठा समाजाने ऍट्रोसीटी कायदा रद्द करण्याच्या मागणीचा फेरविचार करावा असे मत दलित महासंघाचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ मछिंद्र  सकटे यांनी आज श्रीगोंदा येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सकटे हे आज त्यांच्या पत्नी पुष्पलता सकटे यांच्यासह श्रीगोंदा दौर्‍यावर आले होते यावेळी ते म्हणाले कि आज जातीच्या आधारावर होणारी एकी हि खंत असून  त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसली जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली तसेच दिवसेंदिवस दलितांवरील अत्याचारात वाढ होत आहे न्याशनल क्राईम ब्युरो च्या  माहितीनुसार दर अठरा मिनिटाला एका दलितांवर अन्याय होत आहे आजही 37% दलित दारिद्र्यरेषेखाली आहेत 54%दलितांची मूल कुपोषित आहेत,45%दलित  मूल अशिक्षित आहेत तर 27%दलितांना पोलीस ठाण्यात जाण्यापासून रोखलं जात असेही त्यांनी यावेळी सांगितले दलितांवर अत्याचार होत असतानाही आंबेडकरी  चळवळ कुठे दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करून याचे मुख्य कारण म्हणजे आंबेडकरी चळवळीतील लोकांचे लक्ष हे बाबासाहेबांच्या बोटाकडे नसून प्रस्थापित  राजकीय  नेत्यांच्या नोटांकडे असल्याचे त्यांनी सांगितले  तसेच आपण आण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष  पदावरून निवृत्त झालो तेव्हा कर्जबाजारी होतो असे  सांगून प्रामाणिक काम केल्याचे त्यांनी सांगितले.
ऍट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यात काही प्रमाणात सत्यता असून त्याला सवर्ण समाजातील लोकच कारणीभूत असल्याचे त्यांनी  सांगितले तर एखादी अन्याय अत्याचाराची घटना घडल्यावर त्यातील  आरोपी किंवा पीडित  यांना जातीच्या आधारावर विभागने कितपत योग्य आहे असे त्यांना  विचारले असता त्यासाठी समाजातून आधी जात नष्ट करावी लागेल असे त्यांनी सांगितले तर आपला दलित महासंघ हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आंबेडकरी  चळवळ मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून दलित महासंघाने नुकतीच 25वर्षे पूर्ण केली असून निम्म्या महाराष्ट्रात संघटनेचे काम सुरु असल्याचे  त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेसाठी शिवाजी बुलाखे,सलिम सयद,चंद्रकांत सकट, शिवाजी अडागळे, संतोष गोरखे,दादाभाऊ सकट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.