Breaking News

डॉ. सुरेश गायकवाड यांना राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार

औरंगाबाद, दि. 18, ऑगस्ट - डॉ.बा आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागप्रमुख कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड यांना विश्‍वनायक राष्ट्रीय प्रेरणा  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विश्‍वनायक क्रांती ग्रामविकास प्रतिष्ठाण, नवी दिल्ली यांच्यातर्फे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखीनय कार्याबदल हा पुरस्कार प्रदान  करण्यात आला. संसद भवन परिसरात ग.वा.मावळणंकर सभागृहात नुकताच हा कार्यक्रम झाला. मा.सत्यनारायण जठीया अध्यक्ष, संसदीय समिती, मनुष्यबळ विकास  मंत्रालय यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे, संयोजक सुरेश यादव आदींची उपस्थिती  होती. कुलगुरू डॉ बी ए चोपडे, विभागप्रमुख डॉ अंजली राजभोज यांच्यासह प्राध्यापक यांनी डॉ. गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे. डॉ.गायकवाड हे गेल्या 27  वर्षापासून कार्यरत आहेत. बलभीम महाविद्यालयात एन.सी.सी अधिकारी, कॅप्टन म्हणून कार्यरत होते. विद्यार्थी कल्याण संचालक, प्री आयएस केंद्राचे संचालक,  परीक्षा नियंत्रक, कुलसचिव, बीसीयुडी संचालक, बामुटा अध्यक्ष आदी पदांवर काम केले आहे. डॉ.गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ‘आव्हान’ आपती व्यवस्थापन  शिबीर 2009 मध्ये यशस्वीपणे पार पाडला.