0
मुंबई, दि. 18, ऑगस्ट - एचडीएफसी बँकेने आपल्या बचत खात्याच्या व्याज दरात कपात केली आहे. 50 लाख रुपयांहून कमी बॅलन्स असणार्‍या खात्यावर व्याज  दर 0.5 टक्क्यांनी घटवले आहेत. येत्या 19 ऑगस्टपासून नवे व्याज दर लागू होतील. एचडीएफसी बँकेत ज्या बचत खात्यामध्ये 50 लाख रुपयांहून कमी बॅलन्स  असेल, त्यावरील व्याज दर 4 टक्क्यांवरुन 3.5 टक्के करण्यात आले आहेत.
50 लाख रुपयांपेक्षा जास्त बॅलन्स असणार्‍यांना 4 टक्के व्याज दर कायम असेल. याआधी एसबीआय, येस बँक आणि अ‍ॅक्सिस बँकनेही आपल्या बचत खात्यावरील  व्याज दरात कपात केली होती.

Post a Comment

 
Top