Breaking News

मुलांना ऑनलाईन गेमपासून लांब ठेवा; गोवा पोलिसांनी दिला पालकांना सल्ला

पणजी, दि. 19, ऑगस्ट - मुलांना ब्ल्यू व्हेल सारख्या गेम पासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असा सल्ला गोवा पोलिसांनी पालकांना  दिला आहे. या संदर्भात गुन्हे विभागाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या मोबाईल आणि संगणकामध्ये पेरेन्टल कंट्रोल सारखे सॉफ्टवेअर  डाउनलोड करावे तसेच या पचा वापर मर्यादीत असवा. या सर्व गोष्टींकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे गुन्हे विभागाने पत्रकात नमूद केले आहे. ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ  आणि महाराष्ट्रातील मुलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर गोवा पोलिसांनी यासंबंधित पालकांना सूचना केल्या आहेत.
ज्या मुलांनी ब्ल्यू व्हेल गेम खेळण्यास सुरूवात केली असेल त्या मुलांच्या वर्तनात कोणताही बदल दिसून आल्यास तात्काळ पालकांनी मोबाईलमध्ये सर्च हिस्ट्री चेक  करून याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे गुन्हे विभागाचे पोलीस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले.