Breaking News

सोलापूर बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

सोलापूर, दि. 18, ऑगस्ट - सोलापूर बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत विजयी उमेदवारांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी सर्व विधीज्ञ  उपस्थित होते. नूतन पदाधिकार्‍यांनी पुढील कारकीर्द अतिशय चांगल्या प्रमाणे करण्याची ग्वाही दिली. या निवडणुकीत तीन पॅनल होते. यापैकी आपले पॅनलमधून  अध्यक्ष अ‍ॅड. एच. एम. अंकलगी, सचिव अ‍ॅड. आसिफ शेख, सहसचिव अ‍ॅड. अंजली बाबरे हे तर विधी विकास पॅनल मधून उपाध्यक्षपदी अ‍ॅड.राजशेखर कोरे हे  निवडून आले. तर खजिनदारपदी अ‍ॅड. शामराव बिराजदार हे निवडून आले. या निवड प्रक्रियेचे प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून मावळते अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण  मारडकर यांनी त्यांच्या संपूर्ण पदाधिकार्‍यांचे कौतुक करण्यात आले. नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्ष अंकलगी यांनी कार्यकारिणी जाहीर  केली.