0
अकोले, दि. 18 - तालुक्यातील राजकीयदृष्टया समजल्या जाणार्‍या धुमाळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. चंद्रकला  शंकर धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. के. देशमुख यांनी दिली.  सौ. धुमाळ या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते कै.सयाजीबाबा धुमाळ यांच्या स्नुषा असून मागील निवडणूकीत दोन प्रभागातून त्या विजयी झाल्या. या ग्रामपंचायतीवर  सेना भाजपाची सत्ता होती. मात्र तीन आपत्याच्या निकालाने सौ. झोळेकर यांना सरपंच पदावरुन पायउतार व्हावे लागले. विद्यमान उपसरपंच डॉ. रविंद्र गोर्डे यांनी  या ग्रामपंचायतीचे कामकाज पाहिले. त्यानंतर ग्रामपंचायतमधील सर्व महिला सदस्यांनी एकमताने सौ. धुमाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यावेळी ग्रामविकास  अधिकारी नेताजी भाबड, तलाठी बाबासाहेब दातखिळे उपस्थित होते.
नुकतीच सौ. चंद्रकला धुमाळ यांची सरपंचपदी वर्णी लागल्याने त्यांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री मधुकरराव पिचड,  आ. वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव,  सेक्रेटरी  यशवंत आभाळे, अगस्तीचे  संचालक राजेंद्र डावरे, अमृतसागरचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर, अकोले सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ. अनिता धुमाळ, शंभु नेहे आदींनी अभिनंदन  केले.

Post a Comment

 
Top