0
पुणे, दि. 19, ऑगस्ट - खडकी परिसरात असलेल्या पडाळी वस्तीत शुक्रवारी रात्री मोठी आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, दोन सिलिंडर फुटल्याने आगीचा  मोठा भडका उडाला. त्यामध्ये 15 ते 20 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या आठ अग्नीबंब  रवाना करण्यात आल्या. आग एवढी भयंकर होती, की वस्तीमध्ये अग्निशमन दलाचे बंब पोहोचणे कठिण झाले होते. त्यामुळे, वस्तीलगत रॉयल कॅसल गृहप्रकल्पाच्या  अग्निशमन यंत्रणेतून पाण्याची फवारणी करण्यात आली. फायर ब्रिगेडपूर्वीच झालेल्या या तात्पुरत्या मदतीने आग विझवण्यात मोठी झाली. स्थानिक रहिवाश्यांनी सुद्धा  आग विझवण्यासाठी मोठे सहकार्य केले. त्यामुळे, आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. या आगीत जीवित हानी झाली नसली तरीही, मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे  नुकसान झाले आहे. या वस्तीत 50 घरे आहेत. त्यापैकी 25 घरांना याची झळ पोहोचली. तर 15 ते 20 झोपड्या पूर्णपणे भस्मसात झाल्या. आपल्या घराची अशी  अवस्था पाहून एक महिला चक्कर येऊन पडली होती.

Post a Comment

 
Top