Breaking News

दोन महिन्याच्या बालिकेस नाल्यात फेकून आई पसार

नांदेड, दि. 18, ऑगस्ट - माता न तू वैरिणी.. या गीतातील ओळींची आठवण करून देणारी घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे घडली. एका मातेने आपल्या  अवघ्या दोन महिन्याच्या मुलीला नाल्यात फेकून पळ काढला. नाल्यात पडलेली मुलगी आढळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने या मुलीला शासकीय रूग्णालयात  दाखल केले. आता या मुलीची प्रकृती स्थिर आहे. अनैतिक संबंधातून या मुलीचा जन्म झाला असावा असा पोलिसांचा कयास असून नागरिक आणि पोलिस त्या  महिलेचा शोध घेत आहेत. या अज्ञात महिलेविरोधात देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.