Breaking News

माझ्यावरील सर्व आरोप निराधार - नारायण मूर्ती

नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - योग्यवेळी योग्य पद्धतीने उत्तर देईन. त्यांनी केलेल्या आरोपावर तत्काळ उत्तर देणे माझ्या प्रतिष्ठेला शोभत नाही, असे इन्फोसिसचे  संस्थापक आणि माजी अध्यक्ष एन. आर. नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मूर्ती यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 2014 मध्ये इन्फोसिसच्या संचालक  मंडळातून मी बाहेर पडलो तेव्हा माझ्या कुटुंबियांचा विचार मी केला नाही, असे त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.