0
श्रीनगर, दि. 19, ऑगस्ट - सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्यासह तीन जणांना अटक केली. या तीन जणांकडून दोन  हातबॉम्ब आणि दोन एके - 47 जप्त करण्यात आल्या . बांदीपुरा जिल्ह्यातील सुंबल भागात लष्कर आणि पोलिसांनी ही कारवाई केली. अल्ताफ अहमद मीर, इरशाद  अहमद मीर आणि वसीम अहमद डार या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून वांगीपुरा  गावात शोध मोहिम सुरू केली आहे. 

Post a Comment

 
Top