0
लॉस एजंलिस, दि. 18, ऑगस्ट - अमेरिकेतील लष्कराच्या ब्लॅक हॉक या अपघातग्रस्त हेलीकॉप्टरचे अवशेष सापडले. मंगळवारी रात्री या हेलीकॉप्टरचा अपघात  झाला होता. या हेलीकॉप्टरमध्ये पाच कर्मचारी होते. अपघात झाल्याची माहिती मिळताच शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. 
आम्हाला मंगळवारी रात्री हेलीकॉप्टरच्या अपघाताबाबत माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही तत्काळ शोधमोहिम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान हेलीकॉप्टरचे अवशेष  सापडले. मात्र पाच कर्माचा-यांबाबत अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. मात्र त्यांचा शोध सुरु असल्याचे अधिका-यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top