Breaking News

पेट्रोलियम पदार्थांवरील करात कपात करण्याचे जेटली यांचे मुख्यमंत्र्यांना निर्देश

नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - पेट्रोलियम पदार्थांवर आकारण्यात येणार्‍या विक्री कर किंवा व्हॅटमध्ये कपात करावी, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी  सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिले आहेत.
1 जुलैपासून लागू केलेल्या वस्तू व सेवा करात कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, विमान इंधन यांचा समावेश करण्यात आलेला नाही. उत्पादित वस्तुंवर  जीएसटी आकारला जातो . तर अनेक वस्तूंच्या उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून वापरल्या जाणारी पेट्रोलियम पदार्थांवर व्हॅट आकारला जातो . अशा प्रकारे करावर  कर आकारला गेला, तर वस्तूंच्या किंमती स्वाभाविकपणे वाढतील , असे उद्योग क्षेत्राकडून सरकारला सांगण्यात आले होते . याची दखल घेत जेटली यांनी हे निर्देश  दिले.