0
लखनौ, दि. 19, ऑगस्ट - गोरखपूर येथे झालेल्या बाल मृत्यू प्रकरणी सहा आठवड्याच्या आत राज्य सरकारने अहवाल सादर करावा, असा आदेश अलाहाबाद  उच्च न्यायालयाने आज दिला. न्या. विक्रम नाथ व न्या. दयाशंकर तिवारी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. या संदर्भातील याचिकेची पुढील सुनावणी पुढील  सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात बोलताना महाधिवक्ता राघवेंद्र सिंग प्रताप म्हणाले की, मुख्य सचिवांकडून सादर  करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे योग्य ती कारवाई केली जात आहे.

Post a Comment

 
Top