Breaking News

आलुरे गुरूजींना विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

औरंगाबाद, दि. 18, ऑगस्ट - डॉ.बा आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने माजी आमदार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांना माजी  कुलगुरू डॉ आर एस माळी यांच्या हस्ते ‘जीवन गौरव पुरस्कार’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.बी.ए.चोपडे यांनी 4 जून 2014 रोजी कुलगुरु पदाची सुत्रे  हाती घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी जीवन पुरस्कार देण्याची परंपरा सुरु केली. गेल्या तीन वर्षात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 16 मान्यवरांना जीवन  पुरस्काराने गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसराच्या वर्धापनदिनीही (दि.16 ऑगस्ट) रोजी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात यावेत अशी  मागणी होती. माजी आमदार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे अध्यक्षस्थानी होते.  कार्यक्रमास कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे, विशेष कार्य अधिकारी डॉ.वाल्मिक सरवदे, अधिष्ठाता डॉ.दिलीप खैरनार, नलिनीताई चोपडे. परिसर संचालक डॉ अरुण खरात  यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी संचालक डॉ.अशोक मोहेकर, डॉ.रमेश दापके, संजय निबांळकर, डॉ.धनंजय  माने, प्रा.संभाजी भोसले, डॉ अंकुश कदम, नितीन बागल आदींची उपस्थिती होती.