Breaking News

ठाण्यात डॉ. मोंडकरांच्या ‘आचार्य अत्र्यांचे महान समकालीन’ पुस्तकांचे प्रकाशन

ठाणे, दि. 19, ऑगस्ट - आचार्य अत्र्यांच्या साहित्याचे संशोधन करुन डॉ. सुधीर मोंडकर यांनी लिहिलेल्या ‘आचार्य अत्र्यांचे महान समकालीन’, या पुस्तकाचे  अनावरण डॉ. जयंत नारळीकर, डॉ. डी. वाय. पाटील, मीना देशपांडे यांच्या हस्ते झाले. हा प्रकाशन सोहळा अत्रे जयंती निमित्त रवींद्र नाट्यमंदिर येथे झाले.
उध्वेली बुक्स प्रकाशित सदर पुस्तकांविषयी बोलताना ड. राजेंद्र पै म्हणाले, या पुस्तकात अत्र्यांच्या समकालीनांपैकी पहिली व्यक्ती महर्षी कर्वे व अखेरची व्यक्ती डॉ.  नारळीकर, कर्वे गणिताचे आध्यापक, अखेरची व्यक्ती डॉ. नारळीकर हे गणितात रँग्लर आणि स्वत: अत्रे गणिताचे शिक्षक. कर्वे अत्र्यांहून 40 वर्षांनी मोठे व नारळीकर  40 वर्षांनी लहान. या 80 वर्षाच्या काळात झालेल्या शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण या भिन्न क्षेत्रातील 52 महान समकालीन या पुस्तकाद्वारे आपल्या भेटीस  येतील. यावेळी आचार्य अत्रे लिखित अरुण वाचन मालेचेही पुस्तकरुपाने प्रकाशन झाले.