0
नवी दिल्ली, दि. 18, ऑगस्ट - स्पेनमधील बार्सिलोना आणि कॅम्ब्रिल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकही भारतीय जखमी झाला नसल्याची माहिती परराष्ट्र  मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्पेनमधील भारतीय दुतावासाच्या सतत संपर्कात असल्याचेही स्वराज यांनी सांगितले. दरम्यान  स्पेनमधील भारतीय दुतावासानेही +34-608769335 आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर स्पेनमधील भारतीय दुतावासाच्या आपण संपर्कात आहे. स्पेनमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले असून या हल्ल्यात भारतीय व्यक्ती ठार  किंवा जखमी झाल्याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही, असे स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. 

Post a Comment

 
Top