0
पोर्पेटो, दि. 19, ऑगस्ट - इटलीमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ शॉटगन विश्‍वचषक स्पर्धेत पुरूषांच्या ट्रॅप प्रकारात भारताच्या आकाश सहरानने चाहत्यांची  निराशा केली. पात्रता फेरीत उल्लेखनीय कामगिरी करणा-या आकाशला अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पेनच्या अड्रीया मार्टीन्झने 50 पैकी  46 गुणांची कमाई करत विश्‍वविक्रम केला आणि सुवर्णपदक पटकावले. पात्रता फेरीत आकाशने 70 नेमबाजांमध्ये दुसरे स्थान पटकावत अड्रीयापेक्षा चांगली कामगिरी  केली होती. अंतिम फेरीत (अंतिम 6) मध्येही पहिल्या चारपैकी चारही वेळा त्याने अचूक नेम साधला. पण पुढील 21 संधींपैकी 8 संधींमध्ये त्याला गुण कमावता न  आल्याने त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. यजमान इटलीच्या मॅटीआ मारोगिऊने 43 गुणांसह रौप्य तर तुर्कस्तानच्या मुरत इल्बील्गीने 36 गुणांसह  कांस्यपदक पटकावले. 

Post a Comment

 
Top